सोलापूर - आज सकाळपासूनच शहरातील दारू दूकानाच्या समोर गर्दी पहायला मिळाली. दारू दूकान सुरू होणार असल्याची चर्चा जोरदार सुरू झाल्यामुळे सकाळपासूनच दारूच्या दूकानासमोर गर्दी झाली होती. दूकानदारांनी देखील कालच तयारी पूर्ण केली होती. दूकानासमोर चौकोन मारून ठेवले होते. मात्र दारूची दूकान उघडणार नसल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आल्याने तळिरामांच्या पदरी निराशा पडली आहे.
तळीरामांचा घसा कोरडाच! सोलापूरात दारू दूकान उघडणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट
आज सकाळपासूनच शहरातील दारू दूकानाच्या समोर गर्दी पहायला मिळाली. मात्र दारूची दूकान उघडणार नसल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आल्याने तळिरामांच्या पदरी निराशा पडली आहे.
दारू दूकान सुरू होणार असल्याची माहिती सगळीकडे वेगाने पसरली. काल संध्याकाळीच दारू दूकानदारांनी दूकानासमोर चौकोन मारून देखील ठेवले होते. सोशल डिस्टसिंग पाळले जावे यासाठी चौकानात उभे राहून दारूची विक्री करण्याचे नियोजन पूर्ण करण्यात आले होते. सोमवारी सकाळी दारूची दूकान उघडल्यावर सर्वात आगोदर जाऊन दारू घ्यायचे, असे नियोजनही अनेकांनी केले होते.
सोलापूर शहरातील अशोक चौकातील एका दारूच्या दूकानासमोर गर्दी केली होती. दारूची दूकान बंदच राहणार असल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. त्यामुळे सोलापूरातील दारूची दूकानही आणखी काही दिवस पूढील आदेश येई पर्यंत बंदच राहणार आहेत.