सोलापूर- करमाळा येथील म्हैसगावातील विठ्ठल कार्पोरेशन साखर करखान्याने करमाळा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज काढले असल्याची धक्कादयाक माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी पत्रकार परिषदेत रणजित भोगल, प्रदीप ढवळे, अतुल खूपसे, माऊली हळनवार, अशोक भोगल यांनी दिली. रणजित भोगल हे पिंपरी चिंचवड येथे पोलीस दलात कार्यरत आहेत. ते करमाळा येथील रहिवासी आहेत. त्यांच्या नावे देखील जवळपास सव्वा लाखाचे बोगस कर्ज 2013 साली काढले असल्याची माहिती देण्यात आली. सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक यांनी लक्ष घालून हे कृत्य करणाऱ्या साखर कारखान्याच्या संचालकांविरुद्ध फसवणूकीचे गुन्हे दाखल करावे आणि सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशीही मागणी शेतकरी संघटनेचे नेते अतुल खूपसे यांनी केली आहे.
22 कोटी 11 लाखांचे कर्ज शेतकऱ्यांच्या नावे काढले असल्याची माहिती
विठ्ठल कार्पोरेशन या साखर कारखान्याने करमाळा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांकडून 2013 साली खत देतो, असे सांगून त्यांच्या कडील कागदपत्रे घेतली होती. त्याच आधारावर त्यांनी कर्ज काढले असल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली. तब्बल 22 कोटी 11 लाखांचे कर्ज काढण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन संबंधित फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कोथरूड बँकेतून नोटिसा