पंढरपूर -आषाढी एकादशी सोहळ्यातील महापूजेसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. राज्य सरकारने पांडुरंगाच्या महापुजेला परवानगी घ्यावी. परंपरेनुसार आषाढी एकादशी सोहळ्यासाठी विठ्ठल मंदिर समिती 12 जुलै ते 24 जुलै पर्यंत विठ्ठल मंदिर खुले ठेवणार आहे. मात्र, राज्य सरकारने भाविकांना दर्शनाची परवानगी दिली तर त्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.
हेही वाचा -अखेर गोवा बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द, असा जाहीर केला जाईल निकाल
20 जुलैला होणार्या आषाढी एकादशी सोहळ्याच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून सदस्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये आषाढी सोहळा दरम्यान होणाऱ्या विविध कार्यक्रमांबाबत सदस्यांसोबत चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढी सोहळ्यासाठी आमंत्रित करणे, विविध देवस्थानातील संतांच्या पादुकांना देव भेटीची परवानगी घ्यावी, राज्यातील संस्थांकडून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला 18 नैवेद्य दाखवण्याची परवानगी घ्यावी, या प्रमुख विषयांवर मंदिर समितीने सदस्यांसोबत चर्चा केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विठ्ठलाच्या महापूजेसाठी आमंत्रित