सोलापूर - बार्शी येथील विशाल फटे फसवणूक प्रकरण (Vishal Phate Scam Barshi) राज्यभर गाजले आहे. या आर्थिक घोटाळ्यात फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते (SP Tejaswi Satpute) यांनी माहिती देताना सांगितले की, हा आकडा कदाचित शंभर कोटींपर्यंत जाऊ शकतो. पोलिसांची तज्ज्ञ टीम तपास करत आहे. आतापर्यंत 127 तक्रारी आल्या आहेत. सद्यस्थितीत 24 कोटी 84 लाख 11 हजार 520 रुपयांची फसवणूक झाल्याची नोंद झाली आहे. जवळपास 800 तक्रारदार यामध्ये आहेत. या सर्व तक्रारी दाखल झाल्यास शंभर कोटी रुपयांपर्यंत फसवणुकीचा आकडा होऊ शकतो.
- आतापर्यंत 24 कोटी 84 लाखांचा घोटाळा उघड-
बार्शी येथे अनेक सर्वसामान्य नागरिकांना शेअर मार्केटच्या नावाखाली तसेच ज्यादा पैसे मिळवून देतो असे आश्वासन देऊन अनेकांना विशालका या कंपनीत पैसे गुंतवण्यास भाग पाडले. बार्शी येथील अनेक सर्वसामान्य नागरिकांनी यामध्ये गुंतवणूक केली होती. मात्र, विशाल फटे याने कोणताही परतावा न देता कोट्यवधी रुपये लाटले असून, फसवणूक झाली असल्याची बाब समोर येताच विशाल फटे हा फरार झाला होता. त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांना अटक होताच त्याने सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन आत्मसमर्पण केले होते.
- सर्व तक्रारदारांनी तक्रार नोंदवली तर फसवणूक आकडा शंभर कोटींपर्यंत-