सोलापूर - अक्कलकोट रोड रेल्वे स्थानक जवळ भूयारी पूलाची व्यवस्था नसल्यामुळे वाहतुकीसाठी मोठी अडचण निर्माण होत होती. मात्र, आता या ठिकाणी भूयारी पूलाचे भूमिपूजन झाल्यामुळे लवकरच हा प्रश्न मार्गी लागणार आहे.
अक्कलकोट रोड जवळील भूयारी पूलाचा मार्ग मोकळा खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामीजींच्या हस्ते भूमिपूजन - भुयारी मार्ग
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील अक्कलकोट रोड स्थानका जवळील भुयारी मार्गाचे भूमिपूजन सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील अक्कलकोट रोड स्थानकाजवळील भुयारी मार्गाचे भूमिपूजन सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले. या कामामुळे स्थानिकांच्या आणि प्रवाश्यांच्या अडचण दूर होणार आहेत. नागरिकांच्या आणि रेल्वेच्या दृष्टीने हा एक सुरक्षित पर्याय असणार आहे. नागरिकांना गेट वर थांबण्यासाठी लागणाऱ्या वेळेत बचत होणार असून रेल्वे प्रशासनाकडून पुलाखालील भुयारी मार्गाचे काम लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. रोड ओव्हर ब्रिज कामासाठी मंजूरी मिळाली आहे. पुलाखालील भुयारी मार्गाचे काम पुर्ण होताच रोड ओव्हर ब्रिजचे काम करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री व्ही. के. नागर, माजी सभापती महिबूब मुल्ला, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, इंजिनियर जगदिश, गिरीश, अजय शर्मासरपंच रमेश पाटील, सरपंच विरभद्र सलगरे, सरपंच शिवलाल राठोड, चेअरमन महेश पाटील, महातेश्वर पाटील, बंजारा नेता संतोष राठोड उपस्थित होते.