पंढरपूर (सोलापूर) -पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार समाधान आवताडे व विकास आघाडीतील राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या दोन्ही कारखान्यातील आरआरसीची रक्कम थकीत असल्यामुळे उमेदवारी नामंजूर करावी, अशा प्रकारचा अर्ज अपक्ष उमेदवार माऊली हळणवर यांनी निवडणूक आयोगाकडे केली. मात्र, निवडणूक अधिकारी गजानन गुरव यांनी समाधान आवताडे व भगीरथ भालके यांच्या उमेदवारीवर घेतलेला आक्षेप फेटाळून लावला दोन्ही उमेदवाऱ्यांचा अर्ज मंजूर करण्यात आली.
विठ्ठल व दामाजी सहकारी कारखाना 77 कोटी रुपयांची आरआरसी थकीत
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची चांगली रंगात आली आहे. विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत तर दामाजी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे हे भाजपचे उमेदवार अध्यक्ष आहेत. त्यामुळे दोन्ही कारखान्यांवर शेतकऱ्यांची 77 कोटी रुपयांची आरआरसीची थकीत आहेत. यामुळे दोन्ही उमेदवाऱ्यांची उमेदवार नामंजूर करावी, असाही मागणी हळणवर यांनी केली. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याबाबतचा निर्णय राखून ठेवला होता. यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांचे अर्ज मंजूर केले.