सोलापूर -बार्शी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांनी भाजप नेते अन् गृहनिर्माण मंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांच्या कुटुंबावर खालच्या पातळीवर टीका केली आहे. टेंडर मिळविण्यासाठी स्वतःच्या बायकोलाही विकणारी मिरगणेची औलाद, तो काय माझ्याबद्दल बोलणार? अशी असंवेदनशील टीका त्यांनी केली आहे. या टिकेचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यामावर फिरत आहे.
हेही वाचा - आमची परिस्थिती इकडे आड, तिकडे विहीर - महादेव जानकर
सध्या बार्शी विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री आणि शिवसेनेचे उमेदवार दिलीप सोपल आणि अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांच्यात चुरशीची लढत होत आहे. त्या लढाईत मिरगणे यांनी स्थानिक भाजपचा सोपलांना विरोध असताना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या राऊत यांनी मिरगणे यांच्या ठेकेदारीचा संदर्भ देत थेट त्यांच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरले आहेत.
बार्शी तालुक्यात अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांच्याविरोधात निषेधाचा सूर निघत आहे. परिणामी या निवडणुकीत राऊत यांना आपल्या वक्तव्याची किंमत मतदानाच्या रूपाने मोजावी लागणार का? ते निवडणूक निकालावरून स्पष्ट होईल.
हेही वाचा - मतदारांना पैसे वाटणाऱ्या मंत्री लोणीकरांची उमेदवारी रद्द करा - डॉ. रत्नाकर महाजन