महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विविध मागण्यांसाठी सोलापूर वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचा बेमुदत संप - Solapur Latest News

शासन सेवेत सामावून घ्यावे, सातव्या वेतन आयोगाच्या निकषानुसार वेतन द्यावे, कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्यांना आरोग्य सुरक्षा कवच द्यावे. अशा विविध मागण्यांसाठी सोलापूर वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला आहे.

doctors strike news
विविध मागण्यांसाठी डॉक्टरांचा बेमुदत संप

By

Published : Nov 2, 2020, 4:56 PM IST

सोलापूर-शासन सेवेत सामावून घ्यावे, सातव्या वेतन आयोगाच्या निकषानुसार वेतन द्यावे, कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्यांना आरोग्य सुरक्षा कवच द्यावे, अशा विविध मागण्यांसाठी सोलापूर वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे सिव्हील हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या उपचारावर त्याचा परिणाम जाणवत आहे.

विविध मागण्यांसाठी डॉक्टरांचा बेमुदत संप

सोलापूर-वैशंपायन स्मृती शासकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी आजपासून आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांना वेळवर उपचार मिळत नाहीत. डॉ. कुंदन कांबळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. रुग्णालयातील 35 डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले आहेत. तर राज्यभरातील तब्बल 550 डॉक्टर या आंदोलनाला पाठिंबा देत आंदोलनात सहभागी झाले आहेत. लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका या डॉक्टरांनी घेतली आहे.

आंदोलनकर्त्या डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या

1) शासकीय सेवेत सामावून घेणे

2) सातवा वेतन आयोग लागू करावा

3) सर्व शासकीय लाभ मिळावेत

4) कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सुरक्षा मिळावी

ABOUT THE AUTHOR

...view details