महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापुरात आज 1 हजार 536 नव्या कोरोना रुग्णांची वाढ, तर 35 मृत्यू - Corona Review Solapur

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आज एकूण 2 हजार 180 रुग्ण बरे झाले. तर, 1 हजार 536 नवे कोरोना रुग्ण आढळलेत. कोरोनामुळे आज जिल्ह्यात एकूण 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापुरात सद्यस्थितीत शहर आणि जिल्ह्यात एकूण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 15 हजार 307 इतकी आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : May 23, 2021, 9:36 PM IST

सोलापूर -सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आज एकूण 2 हजार 180 रुग्ण बरे झाले. तर, 1 हजार 536 नवे कोरोना रुग्ण आढळलेत. कोरोनामुळे आज जिल्ह्यात एकूण 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापुरात सद्यस्थितीत शहर आणि जिल्ह्यात एकूण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 15 हजार 307 इतकी आहे.

हेही वाचा -मंडप, केटरिंग व्यावसायिकांना शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी

वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यू यामुळे जिल्हा प्रशासनाने सोलापुरातील ग्रामीण भागांत 21 मे ते 1 जून असे दहा दिवस कडक लॉकडाऊन लागू केले आहे. शहरातील कोरोना महामारीची दुसरी लाट हळूहळू ओसरताना दिसत आहे. पण, जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही कोरोना महामारीचा कहर सुरूच आहे. ग्रामीण भागातील पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस आदी तालुक्यात कोरोना विषाणूची लागण झालेले अधिक रुग्ण आहेत. या तालुक्यात दररोज रुग्ण वाढतच आहेत.

सोलापूर ग्रामीण अहवाल

सोलापूर जिल्हा आरोग्य प्रशासनाने 9 हजार 710 जणांची तपासणी केली. त्यामध्ये 1 हजार 503 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्हमध्ये 852 पुरुष व 651 स्त्रिया आहेत. सोलापुरातील ग्रामीण भागात 2 हजार 66 जणांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे, तर कोरोना संसर्गजन्य आजारामुळे 30 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात सद्यस्थितीत 14 हजार 568 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह असून ग्रामीण व शहरी भागातील विविध रुग्णालयांत त्यांवर उपचार सुरू आहे.

सोलापूर शहर अहवाल

सोलापूर शहरात कोरोना महामारीची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. सोलापूर महानगरपालिका आरोग्य प्रशासनाने शहरात 2 हजार 371 जणांची तपासणी केली. त्यामध्ये 33 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये 16 पुरुष आणि 17 स्त्रिया आहेत. सोलापूर शहरात उपचार घेत असलेल्या 114 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरातील 5 रुग्णांनी कोरोना विषाणू समोर दम तोडला आहे. शहरात अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी होत आहे. सद्यस्थितीत 739 रुग्ण पॉझिटिव्ह असून शहरातील विविध रुग्णालयांत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा -ग्रामीण भागात टेस्टींग व ट्रेसिंगची संख्या वाढवा - अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव

ABOUT THE AUTHOR

...view details