महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खासगी दवाखान्यांतील बेडची संख्या वाढवा - जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर - पंढरपूर सोलापूर कोरोना अपडेट

कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळणे आवश्यक आहे. यासाठी खासगी रुग्णालयांनी तत्काळ खाटांची संख्या वाढवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिल्या. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेबाबत नवीन भक्त निवास, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

पंढरपूर
पंढरपूर

By

Published : Mar 31, 2021, 7:44 PM IST

पंढरपूर (सोलापूर)- जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळणे आवश्यक आहे. यासाठी खासगी रुग्णालयांनी तत्काळ खाटांची संख्या वाढवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिल्या.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेबाबत नवीन भक्त निवास, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, तहसीलदार सुशिल बेल्हेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शेगर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले तसेच खासगी रुग्णालयाचे डॉक्टर उपस्थित होते.

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध तत्काळ घ्या

कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी सुरू असलेल्या खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा, मुबलक प्रमाणात औषधसाठा,ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध ठेवावा. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात चाचण्यांची संख्या वाढवावी. संपर्क साखळी तोडण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन तत्काळ तपासणी करावी. नगरपालिका क्षेत्रात प्रशासनाने तर ग्रामीण भागात तालुका आरोग्य प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात. खासगी रुग्णालयांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत जास्तीत-जास्त रुग्णांना लाभ मिळवून द्यावा. खासगी पॅथॉलॉजीमध्ये तपासणी केलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची माहिती तत्काळ आरोग्य विभागाला द्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिल्या. यावेळी बैठकीत उपस्थित खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या अडचणी सांगितल्यावर संबधितांनी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details