महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

IT Raids In Solapur काँग्रेसचे माजी मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या समर्थकांच्या घरांवर आयकर विभागाचे छापे - सोलापूरमध्ये आयकर विभागाचे छापे

सोलापूर शहरात आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी आयकर विभागाची कारवाई सुरू आहे. IT Raids In Solapur शहरातील हृदय रोग तज्ञ डॉ. गुरुनाथ परळे, अश्विनी हॉस्पिटलचे संचालक बिपीनभाई पटेल, मेहुल कन्स्ट्रक्शनचे संचालक मेहुल पटेल, हृदयरोग तज्ञ डॉ. अनुपम शहा यांची हॉस्पिटल व घरांची झडती सुरू आहे. पंढरपूरला येथे देखील एका साखर कारखान्यावर कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

मेहूल कंपनी
मेहूल कंपनी

By

Published : Aug 25, 2022, 9:25 PM IST

सोलापूर - इन्कम टॅक्स विभागाने सोलापुरातील विविध ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. सोलापूर शहरात आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी आयकर विभागाची कारवाई सुरू आहे. शहरातील हृदय रोग तज्ञ डॉ. गुरुनाथ परळे, अश्विनी हॉस्पिटलचे संचालक बिपीनभाई पटेल, मेहुल कन्स्ट्रक्शनचे संचालक मेहुल पटेल, हृदयरोग तज्ञ डॉ. अनुपम शहा यांची हॉस्पिटल व घरांची झडती सुरू आहे. former Congress Minister Sushil Kumar Shinde पंढरपूरला येथे देखील एका साखर कारखान्यावर कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. पंढरपूर येथील साखर कारखानदार अभिजित पाटील यांच्या चार साखर कारखान्यावर ही कारवाई झाली आहे.

अचानक पडलेल्या धाडीमुळे सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळसात रस्ता परिसरात असलेल्या प्रसिद्ध अशा डॉ. गुरुनाथ परळे यांच्या हॉस्पिटलमध्ये आयकर विभागाच्या टीमने छापा मारला आहे. डॉ. गुरुनाथ परळे यांच्या मोबाईलवर संपर्क केला असता स्विच ऑफ दाखवला जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डॉ.गुरुनाथ परळे हे पोंडीचेरी येथे गेले असल्याची माहिती मिळाली. मेहुल कन्स्ट्रक्शनचे संचालक मेहुल पटेल यांच्या राहत्या घरावर पद्मावती कॉम्प्लेक्स येथे आयकर विभागाने छापा टाकला आहे. कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास आयकर विभागाचे अधिकारी टाळाटाळ करत आहेत.

सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थकअश्विनी हॉस्पिटल सात रस्ता व कुंभारी येथील मेहुल कन्स्ट्रक्शनचे संचालक मेहुल पटेल हे बिपीनभाई पटेल यांचे चिरंजीव आहेत. बिपीन भाई पटेल हे काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत. यामुळे काँग्रेस गोटात खळबळ उडाली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे असलेल्या अश्विनी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज येथे आयकर विभागाची कारवाई सकाळी 7 वाजल्यापासून सुरू आहे. पुणे येथील इन्कम टॅक्स विभागाचे जवळपास 50 वाहने सोलापुरात दाखल झाले आहेत.

गाड्यांच्या ताफ्यावर कृषी दौऱ्याचे फलकपुणे इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी सावध भूमिका बाळगत सोलापुरात, गुरुवारी सकाळी प्रवेश केला. यांच्या वाहनांच्या ताफ्यावर कृषी विभाग अभ्यास दौरा म्हणून फलक लावण्यात आले होते. सकाळी 7 वाजता सोलापुरात विविध ठिकाणी एकाचवेळी छापा कारवाई सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा -पुण्यातील येरवडा कारागृहातील कैद्यांची अनोखी कला, पहा या खास रिपोर्टमधून आकर्षक बाप्पा

ABOUT THE AUTHOR

...view details