महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूर जिल्ह्यात संचारबंदीचे धोरण कायम, प्रशासन-व्यापारी असा संघर्ष होण्याची शक्यता

सोलापूर - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दहा दिवसाची संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीला व्यापारी वर्गातून तीव्र विरोध होत आहे. दरम्यान, सोलापूर येथे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व व्यापाऱ्यांची बैठक झाली आहे. मात्र, या बैठकीमध्ये कोणताही तोडगा न निघाल्यामुळे बैठक निष्फळ ठरली. नागपंचमीच्या मुहूर्तावर पंढरपूरमध्ये संचारबंदीवरून प्रशासन व व्यापाऱ्यांमध्ये उद्या संघर्ष होण्याची शक्यता आहे.

सोलापूर जिल्ह्यातील संचारबंदीचे धोरण कायम, प्रशासन-व्यापारी असा संघर्ष होण्याची शक्यता
सोलापूर जिल्ह्यातील संचारबंदीचे धोरण कायम, प्रशासन-व्यापारी असा संघर्ष होण्याची शक्यता

By

Published : Aug 12, 2021, 10:43 PM IST

सोलापूर (पंढरपूर) - जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दहा दिवसाची संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीला व्यापारी वर्गातून तीव्र विरोध होत आहे. दरम्यान, सोलापूर येथे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व व्यापाऱ्यांची बैठक झाली आहे. मात्र, या बैठकीमध्ये कोणताही तोडगा न निघाल्यामुळे बैठक निष्फळ ठरली. नागपंचमीच्या मुहूर्तावर पंढरपूरमध्ये संचारबंदीवरून प्रशासन व व्यापाऱ्यांमध्ये उद्या संघर्ष होण्याची शक्यता आहे.

संचार बंदीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

राज्यात सोलापूर, नगर, बीड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, करमाळा आणि माढा तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा परिणाम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाला होता. संभाव्य येणारी कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी कडक उपाययोजना करणे गरजेचे आहे. प्रशासनाची भूमिका ही सर्वसमावेशक आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यात संसर्ग होऊ नये, तसेच संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून फौजदारी प्रक्रिया संहिता 73 हे कलम 144 नुसार निर्बंध लागू करण्याचे आदेश मिलिंद शंभरकर यांनी केले आहेत. प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली आहे.

संचारबंदीवरून प्रशासन व व्यापाऱ्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता

कोरोना संसर्गाच्या पाहिल्या व दुसऱ्या लाटेच्या कालावधीत जिल्ह्यासह पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरी, व्यापाऱ्यांनी प्रशासनास सहकार्य केले आहे. मात्र, सध्या श्रावण महिना सुरु झाला आहे. या महिन्यात सणासुदीचे मुहूर्त असतात. यामुळे नागरिकांची बाजारपेठेत लगबग असते. मात्र, अशा सणासुदीच्या दिवसांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदी लागू होत आहे. या संचारबंदीमुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. सोलापूर जिल्हाधिकारी व व्यापारी यांची बैठक झाली. मात्र, यामध्ये कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे उद्या पंढरपुरमध्ये व्यापाऱ्यांनीही दुकान उघडण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे प्रशासन व व्यापाऱ्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details