महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना चाचणी नसेल तर रेशनही नाही; पंढरपुर तालुक्यातील 21 गावांत प्रशासनाकडून कठोर उपाययोजना

दहापेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळलेल्या गावांमध्ये तालुका प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. त्या गावातील नागरिकांची चाचणी करून उपचारासाठी कोविड सेंटर येथे पाठविले जात आहे.

पंढरपूर 21 गावे संचारबंदी
पंढरपूर 21 गावे संचारबंदी

By

Published : Aug 28, 2021, 7:59 PM IST

पंढरपूर (सोलापूर) -पंढरपूर तालुक्यातील 21 गावात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 14 दिवसांची संचारबंदी घातली आहे. तालुका प्रशासनाकडून कोरोना चाचण्यांवर भर दिला जात आहे. ग्रामस्थांच्या आरोग्य तपासणी करून लसीकरणावर भर दिला जात आहे.

कोरोना तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून प्रशासनाकडून विविध उपाय केले जात असल्याची माहिती तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.

पंढरपुर तालुक्यातील 21 गावांत प्रशासनाकडून कठोर उपाययोजना
तालुका प्रशासनाकडून ग्रामीण भागात लसीकरणावर भर-पंढरपूर तालुक्यातील 21 गावांमधील संचारबंदीच्या काळात नागरिकांचे जास्तीत जास्त लसीकरण करून घेतले जात आहे. पंढरपूर तालुक्यांमध्ये सध्या 800 हून अधिक रुग्णांवर उपचार चालू आहेत. पंढरपूर तालुक्यातील चार लसीकरण केंद्रावर नागरिकांचे लसीकरण करून घेतले जात आहे. लसीकरणामुळे तालुक्यातील कोरोनाचा धोकाही कमी होण्यास मदत होत आहे.

हेही वाचा-BH SERIES राज्य बदलले तरी वाहनांची करावी लागणार नाही पुनर्नोंदणी


तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा दरही कमी..
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पंढरपूर 65 तालुक्यांमध्ये 13 ते 22 ऑगस्ट या कालावधीमध्ये संचारबंदी लागू केली होती. या संचार बंदीच्या काळात ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील वाढलेल्या कोरोनाची संख्या समोर आली होती. 1 ते 12 ऑगस्ट रोजी तालुक्यात 5.6 टक्के पॉझिटिव्ह रेट होता. तर यामध्ये 1035 कोरोना बाधित रुग्ण होते. दहापेक्षा जास्त रुग्ण असणारी 30 गावे होते. तर एक रुग्ण असलेली 18 गावे होती. होम आयसोलेशनमध्ये 419 रुग्ण त्यावेळी होते.

हेही वाचा-माझे वडील तालिबानसमोर कधीच झुकणार नाहीत- अमरुल्लाह सालेह यांच्या मुलीचे भावनिक ट्विट


तालुका प्रशासनाकडून गावात नो टेस्ट नो रेशन वर भर..
दहापेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळलेल्या गावांमध्ये तालुका प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. त्या गावातील नागरिकांची चाचणी करून उपचारासाठी कोविड सेंटर येथे पाठविले जात आहे. यामध्ये कासेगाव, वाखरी, सुस्ते व तारापूर या गावांमध्ये कोरोना बाधितांनी संख्या जास्त आहे. तसेच गावातील दुकानदार, व्यापारी फळे व भाजी विक्रेते, दूध विक्रेते यांच्यासह इतर व्यवसाय करणाऱ्या नागरिकांची आठवड्यातून एकवेळा कोरोना चाचणी करण्यात येत आहे. तालुका प्रशासनाकडून 21 गावांमध्ये 'नो टेस्ट नो रेशन' ही मोहीम जोरदारपणे सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत या नागरिकांचे टेस्टिंग केले जाणार आहे. त्याच नागरिकांना रेशन दिले जाणार असल्याची माहितीही तहसीलदार बेल्हेकर यांनी ईटीवी भारतशी बोलताना दिली आहे.

हेही वाचा-महाराष्ट्रातील स्टील कंपनीच्या 44 हून अधिक मालमत्तांवर छापे; 175.5 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details