महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इंग्रजीमधून बोलून मी काय आहे हे दाखवण्याची इच्छा होती, मात्र...; सुशीलकुमार शिंदेंनी सांगितला 'तो' किस्सा

बार असोसिएशनचे जुने सदस्य, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ( Former Union Home Minister Sushil Kumar Shinde ) यांनी भाषण देताना मातृभाषेत का बोललं याबाबत सांगितले. कोर्टात असताना इंग्रजीची भीती होती, पण ती हळूहळू कमी झाली.

Sushil Kumar Shinde
सुशीलकुमार शिंदे

By

Published : Oct 16, 2022, 3:55 PM IST

सोलापूर - बार असोसिएशनचे जुने सदस्य, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ( Former Union Home Minister Sushil Kumar Shinde ) यांनी भाषण देताना मातृभाषेत का बोललं याबाबत सांगितले. कोर्टात असताना इंग्रजीची भीती होती, पण ती हळूहळू कमी झाली. आज देखील इंग्रजी भाषेत बोलून मी दाखवले असते. मी काय आहे, पण सोलापूरच्या या धगधगत्या मातीने, मला मातृभाषेत बोलायला लावले. आज हुतात्मा स्मृती मंदिर येथे सरन्यायाधीश उदय लळीत ( Chief Justice Uday Lalit ) यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील व राज्यातील न्यायव्यवस्थेतील मान्यवर उपस्थित होते.

सुशीलकुमार शिंदे प्रतिक्रिया देताना

आठवणींना सुशीलकुमार शिंदेनी उजाळा -सुशीलकुमार शिंदेनी ( Shushil Kumar Shinde ) जुन्या आठवणी सांगितल्या-माजी केंद्रीय गृहमंत्री हे सुरुवातीला सोलापूर जिल्हा न्यायालयात शिपाई,पट्टेवाला या पदावर नोकरीस होते. 1957 साली पालेकर या न्यायधंडाधिकारी यांनी माझी नेमणूक केली होती. सर न्यायाधीश उदय लळीत यांचे आजोबा हे कोर्टात डोक्यावर रुमाल घालून यायचे. गांधी टोपी वाले वकील देखील सोलापूर कोर्टात होते. राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांचे आजोबा डोक्यावर गांधी टोपी घालून कोर्टात यायचे अशा जुन्या आठवणींना सुशीलकुमार शिंदेनी उजाळा दिला.

मातृभाषेत बोलायला लावले -मी इंग्रजीमधून भाषण केले असते पण, मातृभूमीने मराठीत भाषण करायला लावले-भारतीय न्याय व्यवस्थेत इंग्रजी या भाषेला महत्व आहे. मी कोर्टात नोकरीला असताना इंग्रजीची खूप भीती वाटायची असे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. मी आज व्यासपीठावर इंग्रजीमधून भाषण केले असते. मी काय आहे हे दाखवून दिले असते,पण सोलापूरच्या धगधगत्या मातीने मातृभाषेत बोलायला लावले असे शिंदे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details