सोलापूर - प्लॉट नावावर करुन देण्याची मागणी आणि चारित्र्यावर संशय घेत पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खुन केल्याची घटना समोर आली. माढ्यातील शुक्रवार पेठेच्या मोमीन गल्लीमध्ये शुक्रवारी रात्री हा खून झाला. सना इरफान मोमीन (वय २७)असे खुन झालेल्या विवाहितेचे नाव आहे. पीडितेच्या वडिलांना आरोपी पती इरफान रजाक मोमीन, सासरा रजाक मकबुल मोमीन, सासू आसिया रजाक मोमिन या तिघांवर माढा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पती व सासऱ्याला आज पहाटे अटक केली आहे.
चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची हत्या - Madha Crime News
माढ्यातील शुक्रवार पेठेच्या मोमीन गल्लीमध्ये विवाहितेचा खून करण्यात आला. प्लॉट नावावर करुन देण्याची मागणी आणि चारित्र्यावर संशय घेत पतीनेच गळा दाबून खून केला. या प्रकरणी पोलिसांनी पती व सासऱ्याला आज पहाटे अटक केली आहे.
मृत सना हिचा लग्न झाल्याच्या दोन महिन्यापासून शारीरिक व मानसिक छळ सुरू होता. तिच्या आई-वडिलांना लग्नात काही दिले नाही असे म्हणत तिच्या नावावर उस्मानाबाद येथे असलेला प्लॉट आरोपी पतीच्या नावे करण्याची वारंवार मागणी केली जात होती. ती नकार देत असल्याने तिच्या चारित्र्यावर संशयही घेतला जात होता. या कारणांवरून पती इरफान मोमिन याने सनाला गळा दाबून ठार मारले, अशी फिर्याद तिच्या वडिलांनी पोलिसात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिच्या पती व सासऱयाला अटक केली.
दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी शुक्रवारी तिला माढा ग्रामीण रुग्णालयात दाखले केले होते. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर नातेवाईकांनी आरोपींना अटक करण्याची मागणी करत शवविच्छेदनास नकार दिला होता. पोलिसांना आरोपी पती व सासऱयाला अटक केल्यानंतर आज सकाळी अकरा वाजता शवविच्छेदन पार पडले.