पंढरपूर -दारू पिण्याच्या कारणावरून पत्नी सतत बोलत असल्याचा राग मनात धरून पतीने तिचा कुऱ्हाडीने खून केला. ही घटना बुधवारी साडेतीन वाजता पंढरपुरात घडली आहे. मृत महिलेचे नाव राधिका बाबा सावतराव (वय ४९, रा. जुना सोलापूर नाका झोपडपट्टी, हनुमान टेकडी गोशाळा, पंढरपूर) असे आहे.
पंढरपुरात दारू पिण्यास आडकाठी करणाऱ्या पत्नीची कुऱ्हाडीने हत्या - पंढरपूर क्राइम न्यूज
दारू पिण्यासाठी टोकत असल्याने पतीने कुऱ्हाडीने वार करून पत्नीचा खून केला. ही घटना पंढरपुरात घडली. मुलाच्या तक्रारीवरून बाबा सातवराव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंढरपूर
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबा लक्ष्मण सावतराव हे सतत दारू पितात. यामुळे मृत राधिका व पती बाबा यांच्यात सातत्याने भांडण होत असे. राधिका या बाबा सावतराव यांना दारू पीत असल्याच्या कारणावरून नेहमी बोलत होत्या. बुधवारी झालेल्या दोघांच्या भांडणाचा याचा राग मनात धरून पती बाबा सावतरावने घरातील कुऱ्हाडीने तिच्या डोक्यात घाव घालून तिला ठार मारले. याबाबत त्यांचा मुलगा शिवम बाबा सावतराव (वय 19) याने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.