पंढरपूर(सोलापूर) - कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने 65 एकर मधील एमटीडीसीच्या इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी लवकरच गरीब व अल्प उत्पन्न गटातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मोफत उपचारासाठी सर्व सोयी सुविधायुक्त डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
यावेळी नगराध्यक्षा साधना भोसले, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव,माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षिका डॉ. जयश्री ढवळे, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, डॉ. प्रदिप केचे, डॉ.धोत्रे, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी ढोले म्हणाले, डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे आणखी आवश्यक निधीची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी मिलींद शंभर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून 29 लाख रुपये निधी उपलब्ध करुन दिला आला आहे. या निधीतून डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलसाठी आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधनांची खरेदी करण्यात येणार आहे. येथे गरीब व गरजू रुग्णांनाच्या उपचारासाठी अत्याधुनिक मोफत सुविधा उपलब्ध होणार आहेत.