पंढरपूर (सोलापूर) - अयोध्येमध्ये राम मंदिराचे भूमिपूजन झाले, तर इकडे पंढरपूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अडीचशे वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या राम मंदिरामध्ये हिंदू मुस्लीम बांधवांच्या हस्ते आरती करण्यात आली. यामुळे विठोबाच्या नगरीत यानिमित्ताने हिंदू मुस्लीम एकतेचे दर्शन पहायला मिळाले.
विठुरायाच्या नगरीत हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन - हिंदू मुस्लीम एकतेचे दर्शन
पंढरपूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अडीचशे वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या राम मंदिरामध्ये हिंदू मुस्लीम बांधवांच्या हस्ते आरती करण्यात आली.
शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वाड्यात राम मंदिरामध्ये मोठ्या आनंदाने मुस्लीम समाजाने देखील रामाची आरती सोबतच विठ्ठलाची आरती गायली आणि विठ्ठलाच्या या समतेच्या नगरीत एकात्मता नांदते, असाच संदेश दिला.
यानिमिताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहकार प्रदेशाध्यक्ष दिलीपबापू धोत्रे यांनी रामरायाची आरती केली. याप्रसंगी समीर बेंद्रेकर हा मुस्लीम युवक देखील धोत्रे यांच्या समवेत आरतीमध्ये सहभागी झाला होता. प्रसंगी संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. राजेंद्र महाराज मोरे, माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, शाम गोगांव, गणेश पिंपळनेरकर आदि उपस्थित होते.