महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंढरपूर तालुक्यातील उच्चशिक्षित युवकाची आत्महत्या - संदिप राजाराम ननवरे आत्महत्या न्यूज

सिद्धेवाडी येथे उच्चशिक्षित युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संदिप राजाराम ननवरे (वय 27) याने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली.

पंढरपूर तालुक्यातील उच्चशिक्षित युवकाची आत्महत्या
पंढरपूर तालुक्यातील उच्चशिक्षित युवकाची आत्महत्या

By

Published : Jun 7, 2021, 8:22 PM IST

पंढरपूर - तालुक्यातील सिद्धेवाडी येथे उच्चशिक्षित युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संदिप राजाराम ननवरे (वय 27) याने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट सांगण्यात आले आहे. याबाबत पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर करत आहेत.

राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
तालुका पोलीस दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील सिद्धेवाडी येथे संदिप राजाराम ननवरे हा आपल्या आई-वडिलांसोबत रहात आहे. संदीप ननवरे हा ग्राफिक डिझायनिंग क्षेत्रात काम करत होता. मात्र गेल्या काही दिवसापासून तो मानसिकदृष्ट्या हाताश असल्याचे त्याच्या मित्रांकडून सांगण्यात येत आहे. संदीप याने सहा जून सकाळी नऊच्या सुमारास घराच्या छताला दोरी बांधून गळफास घेतला.

पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद
संदीप ननावरे याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. त्यामुळे पंढरपूर तालुका पोलीसानी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण अवचर करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details