महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूर जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस - सोलापूर विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

सोलापूर जिल्ह्यात बुधवारी रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

heavy-rains-with-thunderclap-in-solapur-district
सोलापूर जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

By

Published : Feb 18, 2021, 1:04 AM IST

पंढरपूर (सोलापूर) -पंढरपूर, माळशिरस व सांगोला तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. तसेच जिल्ह्यातील इतर भागातही दिवसभर ढगाळ वातावरण होते. तर काही भागात रिमझिम पाऊस झाला. दरम्यान, बुधवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

फळ बागायत शेतीचे नुकसान -

रब्बी हंगामातील फळधारणा झालेल्या पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त आहे. यामध्ये गहू, हरभरा, करडी, द्राक्ष, डाळिंब, कांदा या फळधारणा झाली आहे. त्यातच अवकाळी पावसामुळे हे पीक वाया जाण्याची शक्यता आहे. तसेच फळ बागायत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड -

सोलापूर जिल्ह्यात सध्या ऊस तोडणी सुरू आहे. अवकाळी पावसामुळे ऊस शेताबाहेर ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांना आली आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. तसेच ऊस तोडणी लांबणीवर पडण्याचीदेखील शक्यता आहे. मंगळवेढा येथे ज्वारीचे पीक अवकाळी पावसामुळे धोक्यात येण्याची चिंता आहे. त्यात ज्वारीच्या पिकाला विमा नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

हेही वाचा - क्वारंटाईनमधून पळालेल्या ४ प्रवाशांसह हॉटेल मालकावर गुन्हा नोंद करण्याचे महापौरांचे निर्देश

ABOUT THE AUTHOR

...view details