सोलापूर - सोलापूर जिल्ह्यात दोन दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान या पावसामुळे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या कासेगाव या गावाला चारही बाजूंनी ओढ्यानाल्यांना आलेल्या पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. गावाला पाण्याचा वेढा पडल्यामुळे जवळपास ७०० मतदार हे मतदानापासून वंचित राहण्याची भीती आहे. कासेगाव या गावात अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक दोन तीन आणि चार हे आहेत. कासेगावातील इंदिरा नगर आणि बिरोबा वस्ती येथील मतदारांना गावात मतदानासाठी जाता येत नाही. गावाला पावसाच्या पाण्याचा वेढा पडला आहे. सकाळी सात वाजल्यापासून सांयकाळी 5 वाजेपर्यंत देखील मतदारांना गावात मतदानासाठी जाता आलेले नाही.
अक्कलकोटमधील कासेगावाला पाण्याचा वेढा, 700 मतदार मतदानापासून राहणार वंचित? - MaharashtraElectionupdates
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या कासेगाव या गावाला चारही बाजूंनी पावसाच्या पाण्याचा वेढा पडला आहे. गावाला पावसाच्या पाण्याचा वेढा पडल्यामुळे जवळपास ७०० मतदार हे मतदानापासून वंचित राहण्याची भीती आहे.
हेही वाचा -मतदान केल्याचे शाईचे बोट दाखवा अन् मिसळवर मिळवा 10 टक्के डिस्काउंट
कासेगाव व परिसरामध्ये काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कासेगाव शेजारील चारी बाजूंच्या ओढ्याला पूर आला असून गावापासून अर्धा किलोमीटर वरती असलेली इंद्रानगर वसाहत व बिरोबा वस्ती येथील जवळपास 750 मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागत आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक 2, 3, 4, मध्ये एकूण मतदान 3216 असून दुपारी चार वाजेपर्यंत 1050 इतकेच मतदान झाले आहे.आज सकाळपासून गावाला पावसाच्या पाण्याचा वेढा पडलेला असून अजूनही गावात जाता येत नाही.