ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूर जिल्ह्यात पावसाचे धुमशान : 24 तासात 172 मिमी पावासाची नोंद, पिकांचे मोठे नुकसान - सोलापुरात मुसळधार पाऊस न्यूज

सोलापूर जिल्ह्यात मागील 24 तासात तब्बल 172 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Heavy rain in Solapur
सोलापूर जिल्ह्यात पावसाचे धुमशान : 24 तासात 172 मिमी पावासाची नोंद, पिकांचे मोठे नुकसान
author img

By

Published : Sep 19, 2020, 1:08 PM IST

पंढरपूर - सोलापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 172 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस शनिवारी पहाटे पर्यंत कोसळत होता. पावसाने ओढ्यांनाही पूर आल्याने, पंढरपूर-पुणे रोडवरील भांडीशेगावच्या पुलावरून पाणी वाहत होते. यामुळे रात्रीपासून पंढरपूर-पुणे आणि पंढरपूर-सातारा या महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. याकारणाने वाहनांच्या रांगा लागल्या आणि प्रवाशी अडकून पडले होते. याशिवाय मुसळधार पावसामुळे उपरीची स्मशान भूमी वाहून गेली. तर ओढ्याच्या परिसरातील शेतीचे मोठे प्रचंड नुकसान झाले.

सोलापूर जिल्ह्यात पावसाचे धुमशान...

मुसळधार पावसामुळे पंढरपूर ते सातारा, पुणे ते पंढरपूर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक भागातील ओढे व नाल्यांना पूर आला. पंढरपूर तालुक्यातील भेंडी शेगाव आणि खडी तर माळशिरस तालुक्यातील बोंडले-बोडले गावात ओढ्याला आलेल्या पूरामुळे रस्ते आणि काही घरांची पडझड झाली. या पावसात ऊस, द्राक्ष, ज्वारी, कांदा यासह अनेक पिकाचे नुकसान झाले. पावसामुळे सांगोल्यातील महूद येथील कासाळ ओढा भरुन वाहू लागला आहे.

पंढरपूर, माळशिरस, सांगोला तालुक्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात पडला. या तालुक्यातील काही मंडळात अतिवृष्टीची नोंद देखील करण्यात आली आहे. करकंब 9 मिमी, पट कुरोली 49 मिमी, भंडीशेगाव 9 मिमी, भाळवणी 62 मिमी, कासेगाव 12 मिमी, पंढरपूर 7 मिमी, तुंगत 1 मिमी, चळे 14 मिमी, पुळूज 9 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा -उजनी धारणातून 30 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; पंढरपूर तालुक्यात पुरसदृश्य परिस्थिती

हेही वाचा -व्यथा सांगण्यासाठी शेतकरी पुत्राने मागितली राज्यपालांच्या भेटीची वेळ

ABOUT THE AUTHOR

...view details