सोलापूर- जिल्ह्यात बुधवारी रात्री अवकाळी पाऊस झाला. पावसामुळे नागणसूर भागातील द्राक्ष शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन हातातोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
सोलापुरात अवकाळी पावसासह गारपीट... द्राक्ष बागांचे मोठे नुकसान - गारपीट सोलापूर बातमी
कोरोनाच्या भीतीमुळे कामगार काम करण्यासाठी शेतात यायला तयार नाही. त्यातच निसर्गाच्या अवकृपेने अवेळी पाऊस, गारपीट झाल्याने शेतकरी हताश झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे, अशी मागणाी शेतकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा...COVID-19 LIVE : राज्यातील चार मोठी शहरे बंद; पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द!
नागणसूर भागात सुमारे 130 शेतकऱ्यांनी द्राक्ष लागवड केली आहे. सध्या द्राक्ष काढणीसाठी आलेले आहेत. तसेच मनुका (बेदाणा) तयार करण्याचे कामही सुरु आहे. शेतकऱ्यांनी रॅकमध्ये माल घालून मनुका बेदाणे तयार करायला सुरुवात केली आहे. मात्र, काल झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान झाले. द्राक्ष काळे पडले आहेत.
एकीकडे कोरोनाच्या भीतीमुळे कामगार काम करण्यासाठी शेतात यायला तयार नाही. त्यातच निसर्गाच्या अवकृपेने अवेळी पाऊस, गारपीट झाल्याने शेतकरी हताश झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे, अशी मागणाी शेतकऱ्यांनी केली आहे.
गुलाब प्रचंडे, धनराज धनशेट्टी, शांतप्पा गंगोंडा, शशिधर हत्तुरे, शिवानंद कोनापुरे, शिवानंद कल्याण, प्रकाश कलशेट्टी या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. तर दुसरीकडे निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे प्रशासनाने त्वरित पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी अमोगसिद्ध खेड यांनी केली.