महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माळशिरस तालुक्यात अतिवृष्टी, पंढरपूर-पुणे महामार्गावरील वाहतूक खोळंबली

माळशिरस तालुक्यातील विझोरी फाट्याजवळ ओढ्यावर चार फुटापर्यंत पाणी आले होते. त्यामुळे पालखी महामार्गावरील वाहतूक अडीच तास बंद ठेवण्यात आली होती. या ओढ्याच्या पाण्यामुळे पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर चार फुटांपर्यंत पाणी वाहत होते.

heavy-rain-in-malshiras
माळशिरस तालुक्यात अतिवृष्टी

By

Published : Jun 14, 2021, 4:55 AM IST

पंढरपूर (सोलापूर) - माळशिरस तालुक्यात रविवारी सायंकाळ चारच्या सुमारास अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला. पंढरपूर-पुणे या पालखी महामार्गावर सुमारे चार फूट पाणी आल्याने वाहतूक खोळंबली होती. महामार्गावरील अडीच तास वाहतूक बंद करण्यात आली होती. दमदार पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागले होते.

माळशिरस तालुक्यात अतिवृष्टी

पुणे-पंढरपूर महामार्गावरील वाहतूक अडीच तास खोळंबली -

माळशिरस तालुक्यातील विझोरी फाट्याजवळ ओढ्यावर चार फुटापर्यंत पाणी आले होते. त्यामुळे पालखी महामार्गावरील वाहतूक अडीच तास बंद ठेवण्यात आली होती. या ओढ्याच्या पाण्यामुळे पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर चार फुटांपर्यंत पाणी वाहत होते. त्यामुळे वाहन चालकांची नुसती तारांबळ उडाली होती तर आजूबाजूच्या फळबागायती व शेतात पाण्याचा ओढा तयार झाला होता.

वेळापूर येथील ओढ्याचे पाणी घरांमध्ये -

माळशिरस तालुक्यात रविवारी झालेल्या संततधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तालुक्यातील वेळापूर येथील ठिकाणी गावच्या मध्यभागी असणाऱ्या ओढ्याला पूर आला होता. वेळापूर गावचे बाजारतळ त्याचबरोबर ओढ्याच्याकडेला असणाऱ्या घरांपर्यंत ओढ्याच्या पात्रातील पाणी पसरले आहे.

हेही वाचा - आजपासून मुंबईची बेस्टमधील एसटीची सेवा बंद - अनिल परब

ABOUT THE AUTHOR

...view details