सोलापूर- शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. जवळपास 5 मिनिटे गारा कोसळत होत्या. वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे काही ठिकाणी झाड उन्मळून पडले. पावसामुळे गाड्यांचे आणि घराचे नुकसान झाले आहे.
सोलापूर शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट, वादळी वाऱ्यामुळे घरांचे नुकसान - सोलापूर न्यूज
वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी गाराही कोसळत होत्या. सोलापूर शहरापासून जवळच असलेल्या मार्डी, कारंबा, बाळे या परिसरात गारांचा पाऊस झाला.
सोलापूर शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट, वादळी वाऱ्यामुळे झाडांसह घरांचे नुकसान
सोलापूर शहर व परिसरात दुपारी तीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी गाराही कोसळत होत्या. सोलापूर शहरापासून जवळच असलेल्या मार्डी, कारंबा, बाळे या परिसरात गारांचा पाऊस झाला.
या गारपिटीमुळे काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. झाडे पडल्यामुळे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.