पंढरपूर -करमाळा तालुक्यातील भिलारवाडी येथे पतीकडून पत्नी आणि मुलीचा धारदार शस्त्राने डोक्यात घाव घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली होती. लक्ष्मी अण्णा माने (वय-30), श्रृती अण्णा माने (वय-12 दोघेही रा. भिलारवाडी, ता. करमाळा) असे निर्घृण खून झालेल्या मायलेकींची नावे आहेत. करमाळा तालुका पोलिसांनी पती अण्णा भास्कर माने याला बुधवारी अटक केले आहे.
झोपीतच धारदार शस्त्राने केले वार -
मिळालेल्या माहितीनुसार, अण्णा माने हे आपल्या कुटुंबास एकत्रित भिलारवाडी येथे राहतात. यामध्ये अण्णा माने यांच्यासह पत्नी लक्ष्मी माने, मुलगी श्रुती माने, मुलगा रोहित माने व सासू असा त्यांचा परिवार आहे. पत्नी, मुलगी व अण्णा हे एका खोलीत तर मुलगा रोहित हा आजीसोबत दुसऱ्या खोलीत झोपले होते. मात्र पत्नी व मुलगी झोपेत असतानाच धारदार शस्त्राने अण्णा माने यांनी डोक्यावर वार केले आणि पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून निघून गेला. त्यानंतर मुलगा रोहित यांने वडिलांना जाताना पाहिले. त्यानंतर सकाळच्या सुमारास लक्ष्मी व मुलगी श्रुती ही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.