महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rajesh Tope Statement on Wine Selling : 'वाइन प्या, असे सांगत नाही; मद्यपानाला आरोग्य विभाग प्रोत्साहन देणार नाही' - आरोग्यमंत्री राजेश टोपे सोलापूर दौरा

किराणा दुकानात आणि मॉलमध्ये वाइन विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य विभाग कधीही मद्यपानाला प्रोत्साहन देऊ शकत नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना दिली.

आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे

By

Published : Jan 30, 2022, 9:48 AM IST

सोलापूर- शेतकरी द्राक्ष बागायतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी किराणा दुकानात आणि मॉलमध्ये वाइन विक्री करण्याचा ( Wine Selling in Super Market ) निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य विभाग कधीही मद्यपानाला प्रोत्साहन देऊ शकत नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना दिली.

आम्ही कुणाला वाइन प्या असे सांगत नाही

मास्कमुक्तीबाबत आयसीएमआर निर्णय घेईल -

तसेच मार्च मध्यापर्यंत किंवा मार्च अखेरीस कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मास्क मुक्तीबाबत त्यांनी सांगितले की, कोविड महामारी रोखण्यासाठी आयसीएमआरने ( ICMR ) कार्य केले आहे. मास्क मुक्तीबाबत तेच निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details