हातमागाच्या उत्पादनावर लागणार क्यूआर कोड - वस्त्रोद्योग समिती प्रमुख एस.के.पुराणिक - hand loom manufacture
पाचव्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सोलापूर शहरातील यंत्रमागधारक संघटनेच्या सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्राहकांना हातमाग उत्पादने अस्सल आहेत हे समजण्यासाठी, तसेच उत्पादनाबाबत संपूर्ण माहिती मिळावी यासाठी आता क्यूआर कोडचा वापर होणार आहे. या बाबतची माहिती वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख एस.के.पुराणिक यांनी सोलापुरात दिली.
पाचव्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सोलापूर शहरातील यंत्रमागधारक संघटनेच्या सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
सोलापूर - हातमागावर तयार होणाऱ्या कपड्यांची निर्मिती आता क्युआर कोडसह केली जाणार आहे, अशी माहिती वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख एस. के. पुराणिक यांनी सोलापुरात दिली आहे. पाचव्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सोलापूर शहरातील यंत्रमागधारक संघटनेच्या सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.