महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंढरपुरात बनावट गुटखा जप्त, ६ जणांवर गुन्हा दाखल

अन्न व प्रशासन विभागाने पंढरपूर येथे गुटख्याची विक्री करणाऱ्या ठिकाणावर छापा टाकला. यामध्ये बनावट गुटखा जप्त करण्यात आला आहे.

पंढरपुरात बनावट गुटखा जप्त, ६ जणांवर गुन्हा दाखल

By

Published : Aug 26, 2019, 10:33 AM IST

सोलापूर -राज्यात गुटखा बंदी असल्यामुळे विक्री करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या गुटख्यावर छापा टाकून गुटखा जप्त करण्यात आला आहे. पंढरपूर येथे अन्न व औषध प्रशासनाने २५ ऑगस्टला बनावट गुटखा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल ताब्यात घेतला आहे. तसेच ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

कारवाईमध्ये गुटखा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य व नकली गुटखा जप्त केला आहे. यासोबतच गुटखा घेऊन जाणारी दोन वाहने जप्त केली होती. अन्न व सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे हजर होऊन पोलिसांनी पकडलेल्या दोन्ही वाहनाची पंचांसमक्ष तपासणी केली. यावेळी गुटखा बनविण्यासाठी वापरण्यात येणारा विविध प्रकारचा कच्चा माल, विविध कंपन्यांचे लेबल व मशिनरिज असल्याचे आढळले. या प्रकरणात मुख्य आरोपी राजेश नरसिंग पांडव हा कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील अळते गावचा रहिवासी आहे. राजेश पांडव हा गेल्या अनेक दिवसांपासून बनावट गुटखा तयार करून वेगवेगळ्या कंपन्याच्या नावाने पाकिटात भरून विक्री करत असल्याची कबुली त्याने दिली. यामध्ये गोवा १०००, किंग गुटखा, बादशाह गुटखा व सैराट गुटखा अशा विविध कंपनीच्या पाकिटात पॅक करून त्याची विक्री केली जात होती.

गुटख्याच्या या व्यवसायात मोहोळ तालुक्यातील अमर मुजावर हा मदत करतो. विविध कंपन्याचे रिकामी पाकिट पुरवण्याचे काम हा अमर मूजावर करीत असून त्यामध्ये मागणीप्रमाणे बनावट गुटखा भरून पूरवठा केला जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात गुन्ह्यातील मुख्य आरोपी राजेश पांडव आणि अमर मुजावरसह ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details