सोलापूर- महाराष्ट्रात गुटखाबंदी असल्यामुळे कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर गुटखा येतो. एका ट्रकमधून अवैधरित्या येणारा ५१ लाख रुपयांचा गुटखा मंगळवारी मोहोळ पोलिसांनी जप्त केला आहे.
कर्नाटकातून आलेला ५१ लाखांचा गुटखा जप्त; मोहोळ पोलिसांची कारवाई - mohol
महाराष्ट्रात गुटखाबंदी असल्यामुळे कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर गुटखा येतो. एका ट्रकमधून अवैधरित्या येणारा ५१ लाख रुपयांचा गुटखा मंगळवारी मोहोळ पोलिसांनी जप्त केला.
पोलिसांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ट्रक क्रमांक (के ए २२ डी ०८८३) या वाहनाची तपासणी केली असता या ट्रकमध्ये पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आढळला. ट्रक चालक पप्पू पाल याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चालक पप्पू पाल हा उत्तर प्रदेशातील असून हा गुटखा कर्नाटकातून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणण्यात येत होता.
पकडण्यात आलेला गुटखा हा कर्नाटकातील झळकी येथून अहमदनगर येथे नेण्यात येत होता. पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनात वाहनात १४० पोते सुगंधित तंबाखू अंदाजे किंमत १४ लाख रुपये व २८० पोते हिरा पानमसाला अंदाजित किंमत ३६ लाख ९६ हजार रुपये एवढ्या किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात भा.दं.सं. कलम १८८, २७२, २७३ व ३२८ त्याचप्रमाणे अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे कलम ५९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.