सोलापूर - शहरात दाखल होणारा गुटख्याचा मोठा साठा पोलिसांनी नाक्यावरच जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. तर 4 जणांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापुरात सहा लाखांचा गुटखा जप्त - gutkha seized in solapur
बार्शीहून येणाऱ्या एका टेम्पोत गुटखा असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. यानंतर पोलिसांनी कारम्बा नाक्यावर सापळा लावला.

बार्शीहून येणाऱ्या एका टेम्पोत गुटखा असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. यानंतर पोलिसांनी कारम्बा नाक्यावर सापळा लावला. यावेळी दुपारच्या सुमारास आलेल्या 'एमएच 06 एजी 2088' क्रमांकाच्या टेम्पोची तपासणी केली असता त्यात 5 लाख 92 हजारांचा गुटखा पोलिसांना आढळून आला. यानंतर पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीस पोलिसांनी अटक केली असून एकूण चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सहायक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर, नासिर शेख, शशी शिंदे, फयाज बागवान, असिफ शेख, शशी कोळेकर, देवा सोलंकर यांचा या कारवाईत समावेश होता.