सोलापूर - येणारा काळ शेतकऱ्यांचा असेल, शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, पीक पद्धती आणि योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पन्न वाढण्यास मदत होणार असल्याचे मत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले. पालकमंत्री यांनी शहर व जिल्ह्याचा आढावा घेत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना खते वाटप करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी केले खत वाटप - सोलापूर पालकमंत्री खते वाटप बातमी
‘शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी कृषीमंत्री, आयुक्त, व अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत, त्यांना मार्गदर्शन करत आहेत. पावसाच्या लहरीपणामुळे शेती बेभरवशाची झाली आहे. मात्र, पीक पद्धती, उसाच्या नवीन पद्धतीचा अभ्यास करून योग्य लागवड केली तर याचा फायदा होत आहे. उत्पन्न व बाजारपेठा पाहून नवनवीन प्रयोगाने पीक लागवड करा. शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे असून नवीन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा’.
वडवळ (ता. मोहोळ) येथील भक्त निवासात कृषी विभागातर्फे आयोजित कृषी संजीवनी सप्ताह शुभारंभप्रसंगी भरणे बोलताना शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलता ते म्हणाले, की ‘शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी कृषीमंत्री, आयुक्त, व अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत, त्यांना मार्गदर्शन करत आहेत. पावसाच्या लहरीपणामुळे शेती बेभरवशाची झाली आहे. मात्र, पीक पद्धती, उसाच्या नवीन पद्धतीचा अभ्यास करून योग्य लागवड केली तर याचा फायदा होत आहे. उत्पन्न व बाजारपेठा पाहून नवनवीन प्रयोगाने पीक लागवड करा. शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे असून नवीन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा’. यावेळी त्यांनी बनावट खते किंवा उगवत नसलेल्या बियाण्यांच्या तक्रारीबाबत कंपन्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करणार असल्याचे सांगितले.
येणारे 25 दिवस कोरोनामुळे खूप धोक्याचे आहेत, गरज असेल तरच शहरात जावा. कोरोनाला घाबरू नका पण योग्य काळजी घ्या. एकत्र जमू नका, मास्कचा वापर, साबणाने स्वच्छ हात धुणे आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. यावेळी माजी आमदार राजन पाटील,जिल्हा कृषी अधिकारी बसवराज बिराजदार,उप विभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार,तहसीलदार जीवन बनसोडे,सभापती रत्नमाला पोतदार,गट विकास अधिकारी अजिंक्य येळे,तालुका कृषी अधिकारी अतुल पवार आदी अधिकाऱ्यांसह शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.