महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंढरपुरात समन्वय अधिकारी नेमा; पालकमंत्री भरणे यांच्या सूचना

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधाला आळा घालण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज पंढरपूर येथे बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री भरणे यांनी सूचना दिल्या. त्यात त्यांनी पंढरपुरात समन्वय अधिकारी नेमा, अशी सूचना केली.

Guardian Minister dattatray bharne meeting with solapur district administration officers
पंढरपुरात समन्वय अधिकारी नेमा; पालकमंत्री भरणे यांच्या सूचना

By

Published : Aug 29, 2020, 5:59 PM IST

पंढरपूर -सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय उपचारापासून मुकावे लागत आहे. यावर समन्वय अधिकारी नेमला जावा, त्या समन्वय अधिकाऱ्याने कोविड बाधित रुग्णांना कोणत्या रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध आहेत आणि अनुषंगिक माहिती नागरिकांना उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधाला आळा घालण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज पंढरपूर येथे बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री भरणे यांनी सूचना दिल्या. या बैठकीस आमदार भारत भालके, नगराध्यक्षा साधना भोसले, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, तहसिलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षिका डॉ. जयश्री ढवळे, डॉ. केचे आदी उपस्थित होते. ही बैठक 65 एकर परिसरातील एमटीडीसीच्या हॉलमध्ये घेण्यात आली.

पुढे पालकमंत्री म्हणाले, पंढरपूर येथे 65 एकर परिसरात उभारण्यात आलेले कोविड केअर सेंटरमधून कोरोना बाधित रुग्णांच्या वेळीच उपचार होतील. या सेंटरला आणि तालुक्यातील शासकीय रुग्णालयांना आवश्यक ती मदत आणि निधी जिल्हा प्रशासन व राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिला जाईल. कोविडच्या कालावधीत चांगले काम करणाऱ्या आशा वर्कर यांच्या मानधनाबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितलं.

जिल्ह्यातील सर्व डेडीकेटेड कोविड रुग्णालये, कोविड केअर रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा वेळेत व्हावा, यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून सर्व ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा वेळेत होईल. कोविड केअर सेंटर आणि रुग्णालय येथे आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा आणि औषधे पुरवठा करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध आहे. पंढरपूर येथे लवकरच समन्वय अधिकारी नियुक्त केले जाईल, असेही पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.

आमदार भालके यांनी कोविड विषाणूची बाधा झालेले आणि न झालेल्या रुग्णांवर वेळीच उपचार होण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. काही खासगी डॉक्टरांकडून सामान्य रुग्णांवर उपचाराला नकार दिला जातो. त्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी पालकमंत्र्यांसमोर केली.

ABOUT THE AUTHOR

...view details