महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 16, 2021, 8:27 PM IST

Updated : Jun 16, 2021, 10:20 PM IST

ETV Bharat / state

सांगोला तालुक्यात चिमुकलीच्या खून प्रकरणात आजोबा व काकीला अटक

सांगोला तालुक्यातील हलदहिवडी येथील दीड वर्षीय बेपत्ता चिमुकलीच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात सांगोला पोलिसांना यश आले आहे.

Sangola police station
सांगोला पोलीस स्टेशन

पंढरपूर -सांगोला तालुक्यातील हलदहिवडी येथील दीड वर्षीय बेपत्ता चिमुकलीच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात सांगोला पोलिसांना यश आले आहे. दिव्यांग असणाऱ्या मुलीचा आजोबा आणि काकीने खून केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. चिमुकलीच्या हत्याप्रकरणी आजोबा आणि चुलतीला सांगोला पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

दीड वर्षांनी लागला खुनाचा छडा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हलदहिवडी येथील अमोल फाळके यांची जान्हवी नावाची दीड वर्षांची दिव्यांग मुलगी 6 जून रोजी बेपत्ता झाली होती. घराच्या अंगणात खेळत असताना सकाळी 8 वाजताच ती अचानक गायब झाली होती. त्याच दिवशी सायंकाळी जान्हवीचा मृतदेह घरापासून एक किलोमीटर अंतरावर एका खड्ड्यातील पाण्यात तरंगताना दिसून आला होता. त्या वेळी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्राथमिक चौकशीने आजोबा, चुलतीला अटक

सांगोला पोलिसांकडून गेल्या 17 महिन्यापासून खुनाचा तपास सुरू होता. पोलिसांनी तपास करुन अवघ्या काही दिवसात आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये जान्हवीच्या सख्ख्या आजोबांनी आपल्या दुसऱ्या सुनेच्या मदतीने कोवळ्या नातीचा जीव घेतल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. परंतु हा खून कोणत्या कारणासाठी केला हे मात्र अजून स्पष्ट झाले नाही.

Last Updated : Jun 16, 2021, 10:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details