महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बार्शी तालुक्यातील ग्रामसेविकेने केला 14 लाख 40 हजार रुपयांच्या अपहार - सोलापूर पोलीस बातमी

बार्शी तालुक्यातील रुई येथील ग्रामसेविकेने 14 लाख 40 रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत विस्तार अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Barshi
बार्शी पोलीस ठाणे

By

Published : Mar 13, 2021, 6:35 PM IST

सोलापूर - बार्शी तालुक्यातील रुई येथील ग्रामसेविकेने विकास कामे न करता 14 व्या वित्त आयोगाच्या धनादेशावर तत्कालीन आणि विद्यमान सरपंच यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन 14 लाख 40 हजार रुपयांचा अपहार केले. या प्रकरणी विस्तार अधिकारी हरी गायकवाड यांनी रुई गावाच्या ग्रामसेविका जयश्री नेहरु दराडे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. ग्रामसेविका दराडे यांच्याविरोधात बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशाप्रकारे केले 14 लाख रुपयांचा अपहार

ग्रामसेविका दराडे या रुई गावात 2018 ते 14 जानेवारी 2020 या कालावधीत ग्रामसेविका म्हणून कार्यरत होत्या. याच काळामधील विकास निधीचे पैसे जयश्री दराडे यांनी 14 जानेवारी, 2019 रोजी ग्रामपंचायतच्या खात्यावरील 2 लाख 50 हजार रुपयांचा धनादेश स्वतःच्या बँक खात्यात वर्ग करून घेतले. 14 वित्त आयोगाच्या बँक ऑफ इंडियाच्या बार्शी शाखेतून सात लाख रुपये संगणक ऑपरेटर कापसे, पाणीपुरवठा कर्मचारी चाबुकस्वार, शिपाई हनुमंत चव्हाण यांच्यासह स्वतःच्या बँक खात्यावर रक्कम जमा करून घेतली. याच खात्यातून पुन्हा 95 हजार 500 रुपये आपल्या खात्यावर जमा करून घेतले. 29 जुलै 2019 रोजी बँक ऑफ महाराष्ट्रच्या गौडगाव शाखेतील 30 हजार रुपये संदीप बाळासाहेब गुंड यांच्यासह अन्य खासगी व्यक्तींच्या नावे जमा केले, अशा प्रकारे एकूण 14 लाख 39 हजार 270 रुपयांचा अपहार केला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशानुसार विस्तार अधिकारी हरी गायकवाड यांनी तक्रार दिली आहे. या प्रकरणी ग्रामसेविका जयश्री नेहरू दराडे यांच्याविरुद्ध येथील पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा -महागाईविरोधात सोलापुरात राष्ट्रवादीचे थाळी बजाओ आंदोलन

हेही वाचा -अनैतिक संबंधातून मित्राचा खून; पोलिसांनी काही तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या

ABOUT THE AUTHOR

...view details