सोलापूर - ( करमाळा ) मांजरगाव ग्रामपंचायतने कोरोना विषाणूची प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सॅनिटायझरचे व डेटॉल साबणाचे घरोघरी जाऊन वाटप केली. त्याचा वापर कसा करायचा व काळजी कशी घ्यायची या विषयी माहिती देणारे पत्रक सोबत देण्यात आले. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना सूचना देण्यात आल्या. यासह घरातून बाहेर न पडण्याविषयी विनंती करण्यात आली.
कोरोनापासून बचावासाठी मांजरगाव ग्रामपंचायत सरसावली, सॅनिटायझरसह डेटॉल साबणाचे वाटप - कोरोना विषाणू
कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना सॅनिटायझर आणि डेटॉल साबणाचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्राम पंचायतने सॅनीटायझरचा वापर कसा करायचा याची माहितीही देण्यात आली.
![कोरोनापासून बचावासाठी मांजरगाव ग्रामपंचायत सरसावली, सॅनिटायझरसह डेटॉल साबणाचे वाटप Solapur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6810522-1101-6810522-1587011827792.jpg)
सॅनिटायझर, डेटॉल साबणाचे वाटप करताना कर्मचारी
सॅनिटायझरचे व डेटॉल साबणाचे वाटप आज दिवसभरात संपुर्ण गावात व वाडी वस्त्यावर घरोघरी जाऊन आम्ही करणार आहोत. या वाटपासाठी सरपंच गायत्री महेश कुलकर्णी, उपसरपंच आबासो चव्हाण, पोलीस पाटील राजेंद्र पाटील, ग्रामसेवक भाऊसाहेब कांबळे, ग्रामपंचायत सदस्य अमोल कुलकर्णी, माजी सरपंच महेश कुलकर्णी तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाऊसाहेब चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.