सोलापूर- पंढरपुरात माघी यात्रेसाठी राज्यभरातून सुमारे तीन लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. बुधवारी पहाटे मंत्रोपचारामध्ये विठ्ठलाची शासकीय महापूजा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली.
माघी यात्रेनिमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा हेही वाचा -पंढरीत माघी यात्रेसाठी दोन लाख भाविक दाखल
पहाटेपासूनच भाविकांनी चंद्रभागा स्नानासाठी गर्दी केली होती. सर्वत्र विठ्ठल नामाचा गजर सुरू आहे. अवघी पंढरी विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमली आहे. विठ्ठल दर्शनाची रांग मंदिरापासून तीन किलोमीटर अंतर असलेल्या गोपाळपूर रोडवरील पत्राशेडपर्यंत गेली आहे. दर्शनासाठी आठ तासाचा अवधी लागत असल्याचे भाविकांनी सांगितले.
हेही वाचा -'मेकअप'साठी रिंकू -चिन्मय सोलापूरात...
मुख दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. यात्रेच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध रंगीबेरंगी फुलांची आकर्षक अशी सजावट केली आहे. यात्रेच्या निमित्ताने शहरातील प्रासादिक विक्रीची दुकाने थाटली आहेत. माघी यात्रेच्या निमित्ताने पंढरीत भक्तीचा महापूर आला आहे.