महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संतापजनक! खरीप अनुदानापोटी सरकारने शेतकऱ्याला दिले फक्त चार रुपये - crop subsidy

सरकारने माढा तालुक्यातील पंडित इंगळे या शेतकऱ्याला खरीपाचे अनुदान म्हणून फक्त ४ रुपये दिले आहेत.

पंडित इंगळे

By

Published : May 22, 2019, 3:45 PM IST

सोलापूर - सरकारने माढा तालुक्यातील एका शेतकऱ्याला खरीपाचे अनुदान म्हणून फक्त ४ रुपये देऊन त्याची क्रूर चेष्टा केली आहे. पंडित इंगळे असे या शेतकऱ्याचे नाव असून तो ढवळस गावाचा रहिवासी आहे.

पंडित इंगळे

सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत . सरकारी पातळीवर शेतकऱ्यांना मदत केली जात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, सरकारने इंगळे यांना फक्त ४ रुपये देऊन शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.

इंगळे यांची १ एकर जमीन असून सुरुवातीला त्यांनी आपल्या जमिनीत उस लावला. मात्र, तो जळून गेल्याने त्यांनी त्यात तूर लावली होती. तूरही जळून गेल्यानंतर पंचनामा करायला आलेल्या तलाठ्याला ही वस्तुस्थिती त्यानी दाखवली. त्यानंतर सरकारकडून केवळ ४ रुपयाचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा झाले. सरकारने ४ रुपये जमा करून माझी चेष्ठा केल्याचे इंगळे यांनी म्हटले आहे. बँकेतून कमीतकमी ५०० रुपये काढता येतात, असे असताना सरकारने दिलेले ४ रूपये कसे काढायचे, असा प्रश्न इंगळे यांना पडला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details