सोलापूर- आरक्षण या प्रश्नाचे राजकारण होत आहे. त्यातून जाती-जातींमध्ये भांडण लावण्याचे काम होते. यातून या देशातील लोकशाही धोक्यात येणार आहे. त्यामुळे आरक्षण द्यायचेच असेल तर सर्वांना आर्थिक निकषांवर द्यावे, अन्यथा सर्वांचेच आरक्षण रद्द करा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी सोलापुरात केली. सिद्धयेश्वर मंदिरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच राजकीय स्वार्थांसाठी जातींचा आधार घेतला जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
...अन्यथा सर्वांचेच आरक्षण काढून टाका - खासदार उदयनराजे - reservation
जातीचे राजकारण करण्यात कोणताही पक्ष अपवाद नाही. सर्वजण एकाच माळेचे मणी आहेत. हे कुठेतरी थांबायला पाहिजे नाहीतर देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत, असा गर्भित इशाराही उदयनराजे यांनी दिला आहे.
जातीचे राजकारण करण्यात कोणताही पक्ष अपवाद नाही. सर्वजण एकाच माळेचे मणी आहेत. हे कुठेतरी थांबायला पाहिजे नाहीतर देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत, असा गर्भित इशाराही उदयनराजे यांनी दिला आहे.
मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लीम यांच्यातील मागास घटकांचे आरक्षण प्रलंबित आहे. ते द्या, अन्यथा शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सर्वधर्म समभावाची भाषा बोलणे बंद करा, असे सांगतानाच यातून सामाजिक स्वास्थ बिघडवण्यापेक्षा ठोस निर्णय घ्यावे लागतील, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.