सोलापूर - बी टेकच्या पात्रता परीक्षेत 89 मार्क मिळवूनही प्रवेशासाठी शेतकरी वडिलांकडे पैसे उपलब्ध न झाल्याने एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वाळूज देगाव येथे ही घटना घडली. रुपाली रामकृष्ण पवार (वय १७ वर्ष), असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
रुपालीने बी-टेकची पात्रता परीक्षा दिली. त्यामध्ये तिला चांगले गुण देखील मिळाले. त्यानुसार तिचा लव्हली प्रोफेशनल अॅकाडमी येथे बी-टेक साठी प्रवेश मिळाला होता. सुरुवातीला या संस्थेत १० हजार रुपये भरले होते. उर्वरीत १ लाख रुपये २० जुलैपर्यंत भरण्याची मुदत होती. त्यासाठी वडिलांनी खपू प्रयत्न केले. त्यांनी शेतीसुद्धा विकायला काढली. मात्र, शेताला देखील ग्राहक मिळाला नाही. त्यामुळे ते हतबल झाले होते. वडिलांची घालमेल अन् प्रवेशशुल्क भरण्याची मुदत संपल्याने रुपालीने हे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.