महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन; सांगोल्यात आज होणार अंत्यसंस्कार - ganpatrao deshmukh death

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते सांगोला मतदार संघाचे 55 वर्षे आमदार होते.

ganpatrao deshmukh
शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन; सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

By

Published : Jul 30, 2021, 10:33 PM IST

Updated : Jul 31, 2021, 2:12 AM IST

सोलापूर - शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान निधन झाले. ते 95 वर्षाचे होते. सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते सांगोला मतदारसंघाचे 55 वर्षे आमदार होते. शनिवारी सकाळी सांगोला येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

  • सांगोला येथील शेतकरी सूत गिरणी येथे अंतिम संस्कार होणार -

गणपतराव देशमुख यांच्यावर शनिवारी सांगोला येथील शेतकरी सूत गिरणी येथे अंतिम संस्कार केले जाणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. मोहोळ तालुक्यातील पेनूर हे गणपतराव देशमुखांचे मूळ गाव आहे. या ठिकाणी शनिवारी सकाळी त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी तासभर ठेवले जाणार आहे. त्यानंतर सांगोला येथील घरी दोन तास अंतिम दर्शन घेता येणार आहे. त्यानंतर सांगोला येथील शेतकरी सूत गिरणी येथे अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

  • दीर्घ आजाराने निधन -

गेल्या महिन्यापासून ते आजारी होते. गेल्या आठवड्यामध्ये त्यांना सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी उपचाराकरीता दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांच्यावर पित्ताशयाची शस्त्रक्रियादेखील पार पडली होती. त्यांच्या प्रकृतीमध्ये मंगळवारपासून चढ उतार सुरु होता. मात्र, दीर्घ आजारानंतर आज त्यांचे निधन झाले.

  • 55 वर्ष होते आमदार -

आमदार गणपतराव देशमुख हे सलग 55 वर्षे सांगोला विधानसभेचे सदस्य होते. एकाच पक्षात राहून एकाच मतदार संघातून सलग 11 वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. 1977 साली ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेतेही राहीले आहेत. तसेच 1978च्या शरद पवार यांच्या पुलोद सरकारमध्ये आणि 1999 च्या काँग्रेसच्या मंत्रीमंडळात मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले होते.

हेही वाचा - Maharashtra Corona Update : राज्यातील मृत्यूसंख्या वाढली, शुक्रवारी २३१ रुग्णांचा मृत्यू

Last Updated : Jul 31, 2021, 2:12 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details