सोलापूर : गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोलापूर शहरातील सम्राट चौक येथील जुगार अड्ड्यावर कारवाई केली. या कारवाईमध्ये एकूण 12 आरोपींना अटक करून 4 लाख 90 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सुनील कामाठी मटका प्रकरणातून गुन्हे शाखेला सवड मिळाली असून इतर बेकायदेशीर धंद्यावर छापे टाकण्यास सुरुवात झाली आहे. सुनील कामाठी तर गुन्हे शाखेला सापडला नाही. पण, किरकोळ मटका एजंट्सना पकडण्यासाठी गुन्हे शाखेची धडपड सुरू आहे.
गुन्हे शाखेने जप्त केलेली वाहने सोलापुरात जुगार अड्डे चालत असल्याच्या अनेक तक्रारी पोलीस प्रशासनाला मिळाल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी जुगार अड्ड्यांवर कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले होते. सोलापूर क्राईम ब्रँचला सम्राट चौक येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा चालत असल्याची माहिती एका खबऱ्याने दिली होती. या माहितीच्या आधारे शुक्रवारी रात्री क्राईम ब्रँचने छापा टाकला. त्यावेळी 12 संशयित आरोपी जुगार खेळत होते. हा अड्डा अश्विन प्रल्हाद शिंदे (वय 32 रा. न्यू बुधवार पेठ, सम्राट चौक सोलापूर) हा चालवत होता. त्यासह जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले व रोख रक्कम 70 हजार 950 रुपये हस्तगत केली. तसेच 11 मोबाईल, 6 दुचाकी वाहने असा एकूण 4 लाख 90 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत, अश्विन प्रल्हाद शिंदे, रविराज बलभीम गायकवाड (वय 35 रा. सलगर वस्ती, सोन्या मारुती मंदिराजवळ), नितीन सुरेश नागटिळक (वय 40, न्यू बुधवार पेठ, सम्राट चौक, सोलापूर), संजय अजित पोळ (वय 40, रा. सैफुल, चाणक्य नगर, सोलापूर), अभिजित शिवनांद म्हमाणे (वय 35, रा. भवानी पेठ, म्हमाणे चाळ, सोलापूर), श्रीनिवास नागनाथ गायकवाड (वय 42, रा. न्यू बुधवार पेठ, सोलापूर), हरीशचंद्र प्रकाश कुंभारे (वय 30, रा. पाकणी, सोलापूर), लक्ष्मण सुरेश कांबळे (वय 24, रा. ईश्वर नगर, सलगर वस्ती सोलापूर), गौरव तुकाराम माळी (वय 36, बानेगाव, ता उत्तर सोलापूर), संदीप बन्सी जाधव (वय 30, रा. बॉबी चौक, न्यू बुधवार पेठ, सोलापूर), शुभम अंकुश गायकवाड (वय 34, रा. मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, न्यू बुधवार पेठ, सोलापूर), राजू काशिनाथ सुर्वे (वय 34, रा. मातोश्री रामबाई आंबेडकर, न्यू बुधवार पेठ, सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तर, पोलीस सब-इन्स्पेक्टर संदीप शिंदे, पोलीस हवालदार दिलीप नागटिळक, पोलीस हवालदार अजय पाडवी, पोलीस नाईक जयसिंग भोई, पोलीस कॉन्स्टेबल सागर गुंड, पोलीस कॉन्स्टेबल अश्रूभान दुधाळ, पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिंदे, पोलीस नाईक चालक काकडे या पोलिसांनी जुगार अड्ड्यावर मुख्यरित्या कारवाई केली.
हेही वाचा -१२ सप्टेंबरपासून धावणार दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या सात अतिरिक्त गाड्या..