सोलापूर - माळशिरसमधील राष्ट्रवादीचे आमदार हणमंतराव डोळस यांच्यावर त्यांच्या जन्मगावी दसूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकाकूल वातावरणात त्यांचे चुलत बंधू यल्लप्पा डोळस यांच्या शेतात डोळस यांचे पुत्र संकल्प यांनी हणमंतराव यांना मुखाग्नी दिला. यावेळी पत्नी कांचन, मुलगी सिद्धी यांना अश्रू अनावर झाले होते.
माळशिरसचे राष्ट्रवादीचे आमदार डोळस यांच्यावर जन्मगावी अंत्यसंस्कार - ncp
श्रद्धांजलीपर शोकप्रकट करताना शरद पवार, विजयसिंह मोहिते-पाटील आणि अजित पवार यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिवंगत हणमंतराव डोळस यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच डोळस परिवाराच्याप्रति सहवेदना व्यक्त केली.
![माळशिरसचे राष्ट्रवादीचे आमदार डोळस यांच्यावर जन्मगावी अंत्यसंस्कार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3157564-thumbnail-3x2-solapur.jpg)
याप्रसंगी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार दिलीप सोपल, दता भरणे, बाळासाहेब पाटील, दीपक चव्हाण, भारत भालके, रामहरी रुपनवर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके-पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, भाजपचे राजकुमार पाटील, कल्याणराव काळे, उत्तम जानकर यांच्यासह अन्यही प्रमुख राजकीय मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्रद्धांजलीपर शोकप्रकट करताना शरद पवार, विजयसिंह मोहिते-पाटील आणि अजित पवार यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिवंगत हणमंतराव डोळस यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच डोळस परिवाराच्याप्रति सहवेदना व्यक्त केली. यावेळी शोकाकूल नागरिकांना हणमंतराव डोळस यांना निरोप दिला.