महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

करमाळ्यात रुग्णांना मोफत घरपोच औषधे; नामरत्न जेनेरिक मेडिकलचा सामाजिक उपक्रम - free medicine delivery karmala

करमाळा शहरात देशभक्त नामदेवराव जगताप सहकारी रुग्णालय अँड रिसर्च सेंटरची उभारणी पूर्ण होत आहे. सहकारी तत्वावर पहिले रुग्णालय करमाळा तालुक्यात उभे राहत आहे, अशी माहिती देशभक्त नामदेवराव जगताप सहकारी रुग्णालय अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी दिली आहे. जगताप यांनी स्वखर्चातून या औषधींचे वाटप केले आहे.

करमाळ्यात रुग्णांना स्वखर्चातून मोफत घरपोच औषधे
करमाळ्यात रुग्णांना स्वखर्चातून मोफत घरपोच औषधे

By

Published : Apr 24, 2020, 1:14 PM IST

करमाळा ( सोलापूर ) -कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्या गोरगरीब गरजू रुग्णांना महिनाभराची औषधीचे मोफत वाटप करण्यात आले आहे. शहरातील नामरत्न जेनेरिक मेडिकलच्यावतीने घरपोच औषधे देण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात शहरातील प्रत्येक गरजू रुग्णांना मोफत आणि घरपोच औषधे पोहोच करणार असल्याची माहिती प्रतापराव जगताप यांनी दिली.

करमाळ्यात रुग्णांना स्वखर्चातून मोफत घरपोच औषधे

शहरात देशभक्त नामदेवराव जगताप सहकारी रुग्णालय अँड रिसर्च सेंटरची उभारणी पूर्ण होत आहे. सहकारी तत्वावर पहिले रुग्णालय करमाळा तालुक्यात उभे राहत आहे, अशी माहिती देशभक्त नामदेवराव जगताप सहकारी रुग्णालय अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी दिली आहे. जगताप यांनी स्वखर्चातून या औषधींचे वाटप केले आहे. करमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती चिंतामणी जगताप यांच्या हस्ते या औषधांचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी सभापती राहुल जगताप उपस्थित होते.

हेही वाचा -मालेगाव शंभरी पार करणारा राज्यातील पहिला तालुका; एकाच दिवशी 14 कोरोना 'पॉझिटिव्ह'

ABOUT THE AUTHOR

...view details