सोलापूर -घरपोच दारूचा पुरवठा केला जाईल, अशी बोगस जाहिरात करून आर्थिक फसवणुकीचे प्रकार सोलापुरात उघडकीस आले आहेत. घरपोच दारू पुरवठा केला जाईल, या नावाखाली अनेकांकडून ऑनलाईन पैसै घेऊन फसवणूक करण्यात आली आहे. दारूचे व्यसन असलेले अनेकजण या फसवणुकीला बळी पडले आहेत. मात्र सर्व प्रकार बेकायदेशीर असल्यामुळे या प्रकरणात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
घरपोच दारूच्या नावाखाली फसवणूक, जाहिरातीच्या माध्यमातून केली जातेय ऑनलाईन लूट - सोलापूरात फसवणूक
सोलापुरात घरपोच दारूचा पुरवठा केला जाईल, अशी बोगस जाहिरात करून अर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दारू दुकानाच्या मालकाने करमाळा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

दारूचा घरपोच पुरवठा केला जाईल अशी जाहिरात सोशल मीडियावर पडली आणि पाहता पाहता प्रचंड व्हायरल झाली. 23 मार्चपासून ज्यांना दारू मिळाली नाही, त्यांच्यासाठी ही जाहिरात म्हणजे आनंदाचा क्षण होता. घरपोच दारू पाहिजे असेल तर फोन पे, गूगल पे च्या माध्यमातून पैसै जमा करण्यासाठी सांगण्यात आले. अनेक दिवसांपासून दारूसाठी व्याकूळ झालेल्यांनी लागलीच ऑनलाईन पैसेही जमा केले. पैसे जमा करूनही त्यांना दारू काही मिळाली नाही. त्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याची कल्पना झाली.
घरपोच दारूच्या नावाखाली काही भामट्यांनी फसवणूक केली आहे, हे जरी खरे असले तरी तक्रार कोणाकडे करायची आणि काय म्हणून करायची कारण ऑनलाईन दारूची विक्री हा सर्व प्रकारच बोगस होता. ज्या दारूच्या दुकानाच्या नावाने ही जाहिरात करण्यात आली होती. त्या दुकानाच्या मालकाने ही जाहिरात कोणीतरी फसवणूक करण्याच्या उद्देशाने केली असल्याची तक्रार करमाळा पोलिसात दिली.