सोलापूर- वळसंग पोलीस ठाण्याच्या Walsang Police Station हद्दीतील हालचिंचोळी ( ता. अक्कलकोट, जि. सोलापूर ) येथील चौघांना एका तोतया पोलीस कॉन्स्टेबलने पोलीस भरती करत Police recruitment lure by fake police Akkalkot असे सांगत 2 लाख 40 हजार फसविले आहे. पोपट रामचंद्र चौघुले (वय 32 वर्ष, रा भाळवणी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) या तोतया पोलिसाला वळसंग पोलिसांनी अटक करून त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. विशेष म्हणजे, संशयित आरोपी पोपट चौघुले याने पोलिसांसारखा युनिफॉर्म देखील शिवला होता आणि पोलीस युनिफॉर्ममध्ये व्हाट्सअप कॉल करून पैसे उकळत looted money by making fake whatsapp calls Solapur होता. याबाबत मलकासिद्ध रमेश जमादार (वय 28, रा. हालचिंचोळी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर ) यांनी फिर्याद दिली आहे. वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक म्हळप्पा सुरवसे यांनी अधिकृत माहिती दिली.
युनिफॉर्मवरील डीपी ठेवत चौघांकडून अडीच लाख उकळले-तोतया पोलीस कॉन्स्टेबल पोपट रामचंद्र चौघुले याने एका टेलरकडून खाकी शर्ट खाकी पॅन्ट,पोलीस बॅच लावलेलं पोलीस कॉन्स्टेबलच हुबेहूब ड्रेस शिवून घेतला. व्हाट्सअपवर डीपी देखील पोलीस युनिफॉर्म मधील ठेवला होता. यावरून तो पोलीस भरतीची प्रॅक्टिस करणाऱ्या चौघांना व्हिडीओ कॉल करत होता.
पोलीस भरती करतो, अशी थाप मारली-हालचिंचोळी (ता अक्कलकोट )येथील तरुणांशी संपर्क करत त्याने पोलीस भरतीचे आश्वासन दिले होते.10 मे पासून तोतया पोलीस चार तरुणांना व्हिडीओ कॉल करत पैशांची मागणी करत होता. मलकारसिद्ध रमेश जमादार,रवी गेनसिद्ध जमादार,समर्थ अशोक भगत,आकाश चंद्रकांत कोळी हे चौघे तरुण पोलीस भरतीच्या आमिषाला बळी पडून तोतया पोलीस पोपट चौघुलेस प्रत्येकी 60 हजार रुपये रक्कम दिली होती. 10 मे पासून 1 सप्टेंबर पर्यंत एकूण 2 लाख 40 हजार रुपये रक्कम दिली होती.