महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापुरात 'हाफ मॅरेथॉन'पूर्वी 'हायड्रोजन' गॅसच्या टाकीचा स्फोट, चौघे जखमी - चौघे जखमी

सोलापुरातील हाफ मॅरेथॉनच्या सुरुवातीलाच फुगे फुगवण्यासाठी आणण्यात आलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात चौघे जखमी असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.

स्फोटानंतर तपास करताना पोलीस
स्फोटानंतर तपास करताना पोलीस

By

Published : Jan 5, 2020, 1:52 PM IST

सोलापूर- सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या हाफ मॅरेथॉनच्या सुरुवातीलाच फुगे फुगवण्यासाठी आणण्यात आलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे 4 जण जखमी झाले. त्यावेळी घटनास्थळी सोलापूर शहर पोलीस दलाच्या बॉम्बशोधक नाशक पथकाने तातडीने भेट देऊन आढावा घेतला.

सोलापुरात 'हाफ मॅरेथॉन'पूर्वी 'हायड्रोजन' गॅसच्या टाकीचा स्फोट


सोलापुरात रनर्स असोसिएशन च्यावतीने मॅरेथॉन 2020 चे आयोजन करण्यात आले होते. आज (दि. 5 जाने.) हरिभाई देवकरण प्रशाला येथून मॅरेथॉनची सुरुवात झाली होती. मॅरेथॉनची सुरूवात होण्यापूर्वी शोभेचे फुगे फुगविण्यासाठी आणलेल्या गॅस टाकीचा स्फोट झाला.

या स्फोटात फुगे विकणाऱ्यासह 4 जण जखमी झाले. या स्फोटाच्यावेळी त्याठिकाणी जवळपास 5 हजार धावपटू उपस्थित होते. अचानक स्फोट झाल्यामुळे तेथे एकच खळबळ उडाली. या प्रकरणी शहर पोलीस अधिक चौकशी करत असून सध्या घटनेतल्या जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिवाय उर्वरित मॅरेथॉन स्पर्धाही सुरळीत पार पडली.

हेही वाचा - सोलापूर आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन : देश-विदेशातील 6 हजार धावपटूंचा सहभाग

ABOUT THE AUTHOR

...view details