सोलापूर- शहरात आज हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यपूर्वकाळात १२ जानेवारी १९३१ ला म्हणजे आजच्या दिवशी सोलापुरातल्या या हुतात्म्यांना फासावर लटकविण्यात आले होतं. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्साठी आज सोलापुरात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत हुतात्मादिन साजरा करण्यात आला.
हुतात्मा दिन : सोलापूरच्या 'त्या चार वीरांना' माजी केंद्रीय गृहमंत्र्यांचे अभिवादन - प्रणिती शिंदे आमदार
सोलापूरचे सुपत्र मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन यांना आज माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि त्यांची कन्या आमदार प्रणिती यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी निर्मलताई ठोकळ यांच्यासह शहरातील मान्यवर आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी चार हुतात्म्यांच्या इतिहासाला उजाळा देताना शिंदे म्हणाले, सोलापूर शहर सर्व धर्म समभावाची जपणूक करणारं शहर आहे. आजच्या दिवशी १९३१ पहाटे ५ वाजता सोलापूरच्या चारही सुपुत्रांना येरवड्याच्या तुरूंगात फाशी देण्यात आली. या हुतात्म्यांनी देशापुढे हा देश सर्वधर्म समभावाचा असल्याचे त्यावेळीच दाखवून दिले, असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. त्याचप्रमाणे आपण भारतीय घटनेच्या बळावरच लोकशाही बळकट करु, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.