महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'देशातील सामाजिक परिस्थिती मृतावस्थेकडे चालली' - माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे पंढरपूर बातमी

माजी केंद्रीय मंत्री शिंदे यांनी येथील ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक, भागवताचार्य वा. ना. उत्पात, कीर्तनकार रामदास महाराज जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. कुटुंबीयांचे सांत्वन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Sushilkumar Shinde
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे

By

Published : Oct 10, 2020, 7:34 PM IST

Updated : Oct 10, 2020, 9:05 PM IST

पंढरपूर(सोलापूर) - देशात सध्या जे काही वातावरण तयार झाले आहे, त्यावरून देशातील सामाजिक परिस्थिती ही मृतावस्थेकडे चालली असून देशात बेबंदशाही सुरू आहे, अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोदी सरकारवर आज पंढरपुरात केली.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे

हेही वाचा -'अजित पवारांना दाखवून द्या, आम्ही पण तुमचे बाप आहोत'

माजी केंद्रीय मंत्री शिंदे यांनी येथील ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक, भागवताचार्य वा. ना. उत्पात, कीर्तनकार रामदास महाराज जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. कुटुंबीयांचे सांत्वन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले, देशातील विरोधी पक्ष विस्कटलेला आहे. देशहितासाठी आता सगळ्या विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीला त्यांनी पाठींबा दिला आहे. मोदी सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था घसरत आहे. सामाजिक शांतता नाही. महिलांवर अत्याचार वाढत आहेत. अशा सगळ्या घटनेमुळे देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चालल्याची टीका शिंदे यांनी केली. सुशांत प्रकरणात सोशल मीडियातून काही फेक अकाऊंट बनवून मुंबई पोलिसांची बदनामी केली. सोशल मीडियाच्या चुकीच्या वापराचा मलाही फटका बसला असून, त्याचा वापर विचार करून करावा, असा सल्ला शिंदे यांनी दिला आहे. तर प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत बोलण्यास शिंदे यांनी नकार दिला.

Last Updated : Oct 10, 2020, 9:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details