महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Corona : जिल्हा प्रशासनाकडून 4 हजार कुटुंबांना धान्य पाकिटांचे वितरण

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या स्थलांतरित मजूर, निराधार गरजू कामागारांना जिल्हा प्रशासनामार्फत स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून धान्य पाकिट वितरित करण्यात येत आहेत. यानुसार शनिवारी जिल्ह्यात 4081 कुटुंबांना पाकिटांचे वितरण करण्यात आले.

food-packets-distributed-to-needy-people-in-solapur
Coronaupdate: चार हजार कुटुंबांना धान्य पाकिटांचे वितरण; जिल्हा प्रशासनाकडून गरजूंना झाले धान्याचे वाटप

By

Published : Apr 4, 2020, 2:43 PM IST

सोलापूर- लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या 4081 कुटुंबांना जिल्हा प्रशासनामार्फत अन्नधान्याची पाकिटे देण्यात आली. या पाकिटात गहू, तांदूळ, ज्वारी, डाळ, साखर, तेल, मसाला या जीवनावश्यक वस्तू आहेत. अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.


लॉकडाऊनमुळे अडकलेल्या स्थलांतरित मजूर, निराधार गरजू कामागारांना जिल्हा प्रशासनामार्फत स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून धान्य पाकिट वितरित करण्यात येत आहेत. यानुसार शनिवारी जिल्ह्यात 4081 कुटुंबांना पाकिटांचे वितरण करण्यात आले.

सोलापूर शहरात 2250 लोकांना तयार भोजनाचे पॅकेट देण्यात आहे. 36 निवारा गृहांत 3155 लोकांना जेवण देण्यात येत आहे.दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना घरपोच औषधे आणि जीवनावश्यक वस्तू देण्यात येत आहेत. यासाठी सुरु करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षात आज 64 दूरध्वनी आले. त्यापैकी 16 नागरिक दिव्यांग होते. अशोक भोसले आणि रामचंद्र देशमुख, सोलापूर शहर यांना घरपोच औषधे देण्यात आली.

सायबा गायकवाड, रुक्मिणी माडगुंडी, भास्कर आप्पंम, नगमा शेख यांनी जीवनावश्यक वस्तू मिळण्याबाबत मागणी केली होती. त्यांच्या मागणीबाबत पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याचे, या कक्षाचे समन्वय अधिकारी कैलास आढे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details